ताज्या अपडेट

मोफत मिळणार जीओचा स्मार्टफोन

 Image result for reliance jio



'हवं तेवढं फुकट बोला, हवे तेवढे एसएमएस फुकट करा आणि इंटरनेटही फुकट वापरा', अशी जबरदस्त जिओ ऑफर देऊन मोबाइल विश्वात गेल्या वर्षी खळबळ उडवून देणाऱ्या रिलायन्सने आज मोफत 'जिओ फोन'ची घोषणा केली आहे. कंपनीच्या 40व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी हा फोन लाँच केला.

येत्या 24 ऑगस्टपासून जिओ फोनचं बुकिंग सुरू होणार आहे. त्यासाठी 1500 रुपयांची अनामत रक्कम भरावी लागेल. ही रक्कम तीन वर्षं फोन वापरल्यानंतर ग्राहकांना परत दिली जाणार आहे. या जिओ फोनवर 153 रुपयांत हवं तेवढं इंटरनेट वापरता येईल. जिओचा हा फोन टीव्हीलाही जोडता येणार आहे.

या स्मार्टफोनचे फिचर


👉 512 MB रॅम, 4 GB इंटर्नल स्टोरेज

👉 ड्युअल सिम स्लॉट

👉 2 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा आणि VGA फ्रंट कॅमेरा

👉 2000 mAh क्षमतेची बॅटरी

👉 ब्ल्यूटूथ आणि व्हिडिओ कॉलिंग सपोर्ट

जिओ फोन ग्राहकांच्या हातात कधी पडणार?
जिओचा फीचर फोन 24 ऑगस्टपासून प्री बूकिंग करता येईल. त्यामुळे जो अगोदर बूक करणार त्यालाच हा फोन अगोदर हातात पडणार आहे. प्रत्येक आठवड्याला 50 लाख फोन ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहेत.

15 ऑगस्टपासून डिजीटल फ्रीडम


मुकेश अंबानींनी केलेल्या दुसऱ्या महत्त्वाच्या घोषणेमध्ये डेटा प्लॅनचाही समावेश आहे. 15 ऑगस्टला रिलायन्स तगडे डेटा प्लॅन घेऊन येणार आहे. त्याला रिलायन्सने डिजीटल फ्रीडम असं नाव दिलं आहे.

मोफत मिळणार जीओचा स्मार्टफोन मोफत मिळणार जीओचा स्मार्टफोन Reviewed by Vijay Dole on 01:07 Rating: 5

No comments:

Theme images by sebastian-julian. Powered by Blogger.