आज जगात असा एकही व्यक्ती नाही की जो ताणतणावात नाही. टेंशन, प्रॉब्लेम, ताणतणाव या गोष्टी आता आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग झाल्या आहेत. मग टेंशन अभ्यासाचे असो की नात्यांचे, करिअरचे असो की इतर कोणतं या सगळ्यातून आपण बाहेर पडू शकतो? कसे ते पाहूया...
आठवड्यातून किमान तीन वेळा किंवा दिवसातून अर्धा तास व्यायामाला द्यावा. व्यायामामुळे ताण-तणाव कमी होऊन आरोग्य चांगले राहते.
शरीराला मसाज करण्यामुळेही ताण निघून जातो. त्यासाठी स्पामध्ये जाऊन मस्त मसाज करून घेऊ शकता. तिथला मंद सुगंध, आल्हाददायक संगीत यामुळे मस्त वाटतं आणि ताण-तणाव दूर ठेवता येतो.
ताण-तणाव कमी करण्यासाठी आरोग्यदायी आहार घ्यावा. तेलकट, तुपकट पदार्थांऐवजी फळं, घरचे साधे जेवण घ्यावे.
कामाच्या नादात आपण झोपेचं खोबरं करतो आणि चिडचिड होते. त्यामुळे शांत तसेच पुरेशी झोप घ्या आणि मस्त राहा.
कसं कराल टेंशनचं मॅनेजमेंट?
Reviewed by Vijay Dole
on
10:26
Rating:
No comments: